लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टरेशन प्लँटची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी

0
12

नाशिक,दिनांक: 20 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा): विंचूर-लासलगाव १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टरेशन प्लँटची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी योजनेची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत गट विकास अधिकारी महेश पाटील, निवासी नायब तहसिलदार सुजाता वायळ, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, लासलगावचे सरपंच तथा ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर, वसंत पवार, भाऊसाहेब भवर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

लासलगाव-विंचूर सोळा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची साडे सहा कि.मीची पाईपलाईन नव्याने करण्यात आल्याने सद्यस्थितीत गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. तसेच येणाऱ्या काळात या योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून यामुळे विजेची बचत होणार आहे. या योजनेचे संपूर्ण नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करून गावांना होणारा पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here