पत्रकार अधिस्वीकृती समिती मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी दीपक कैतके यांची निवड

मुंबई, दि. २४ : पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी दीपक हनुमान कैतके यांची आज निवड करण्यात आली. समितीच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य विभव बिरवटकर, राजू सोनवणे, चंदन शिरवाळे, विनया देशपांडे उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ नुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.

श्री. कैतके हे देवपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड येथील रहिवासी असून ते दै. महासागर आणि हिंदुस्थान पोस्टचे मुंबई प्रतिनिधी म्हणून काम पाहतात.

प्रारंभी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे यांनी उपस्थित समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व श्री. कैतके यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. कांबळे आणि उपस्थित समिती सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

००००