‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांची उद्या मुलाखत

मुंबईदि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

वन्यजीव, प्राणी निसर्ग साखळीतील महत्वाचा घटक असून प्राणीपक्ष्यांशिवाय मानवी जीवनाचा समतोल साधणे अशक्य आहे. निसर्ग साखळीतील वन्यजीव प्राण्यांचे महत्व लक्षात घेऊन शासनस्तरावर त्यांच्या अधिवासाचे जतनसंवर्धन आणि संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठीच मुंबई महानगरालगत असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव प्राण्यांची कशा प्रकारे काळजी घेण्यात येत आहेतेथील जैवविविधता याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जंगले यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवारदि. ३१ ऑगस्ट२०२३ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक ट्विटर 

https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000