भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबई येथून प्रयाण

0
6

मुंबई, दि. १ : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी दिल्लीकडे प्रयाण केले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ दिला. मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह लष्कर व नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here