मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मॉरिशसला प्रयाण

0
4

मुंबई, दि. १३ : मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत आगमन झाले होते. एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी विविध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुंबई भेटीनंतर मॉरिशसचे प्रधानमंत्री श्री. जगन्नाथ यांचे आज पहाटे मॉरिशसकडे प्रयाण झाले.

मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी विमानतळावर उपस्थित होते.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here