पुणे येथे २२ सप्टेंबरपासून दुसरी ‘खेलो इंडिया वुमन्स लीग’

0
10

नवी दिल्ली, दि. 21 : भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र, मुंबई यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने दुसरी खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीग (शहर/विभागस्तर) 2023 ही स्पर्धा पुणे येथे  होणार असल्याची घोषणा केली आहे.

ही  स्पर्धा 22 सप्टेंबर 2023 पासून बाबूराव सणस मैदान, सारसबाग, पुणे, येथे होणार आहे. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट श्रेणींमध्ये) सहभागी होतील. एक खेळाडू जास्तीत जास्त 2 प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो.

या लीगमध्ये होणाऱ्या विविध क्रीडाप्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

ट्रॅक आणि फील्ड: 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मीटर धावणे;  लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक.

खेळाडूंनी आपली नावे खालील लिंकवर नोंदणी करावीत :

http://www.smrsports.in/athletic/registration/1694443132R1Fg1s5hIkqOzcm9fJYxbNhfgyKhtenM

खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीगमध्ये महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील महिला खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. धावणे, उडी, थ्रो आणि रोड रेस यासह विविध ट्रॅक आणि फील्ड क्रीडा प्रकारात खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.

खेलो इंडिया महिला लीगचा मुख्य उद्देश खेळाडूंना स्पर्धा करण्यासाठी आणि करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांचे पाऊल भक्कम करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.

* * *

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 175, दि.21.09.2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here