मुंबई, दि. 17 : मालीचे वाणिज्यदूत विकास मित्तरसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची आज शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने काम करते, पणन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजना याविषयी माहिती मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितली. कृषी माल प्रक्रिया, कृषी मालाची निर्यात या बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कृषी माल निर्यातीसाठी माली वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.
*****
शैलजा पाटील/विसंअ/