मुंबई, दि. ६ : केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि आयुष्य संचालनालय यांच्यामार्फत मंगळवार, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ५.३० वाजता रेसकोर्स, महालक्ष्मी, मुंबई येथे एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद करिता ‘रन फॉर आयुर्वेद’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ‘धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने २०१६ मध्ये ‘आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित केला आहे. या वर्षी आयुष मंत्रालय 8 वा आयुर्वेद दिवस 2023 ‘एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद’ या घोषवाक्यासह साजरा करीत आहे. जी 20 च्या पारंपरिक औषधावर आणि G20 प्रेसिडेन्सीची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ या घोषवाक्यासह प्रत्येक दिवशी प्रत्येकासाठी आयुर्वेद”, मानव प्राणी वनस्पती- पर्यावरण इंटरफेसवर लक्ष केंद्रित करणे हे उद्दिष्ट आहे.
यादरम्यान आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आर. आर.ए.पी. केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था, पोदार मेडिकल कॅम्पस, वरळी, मुंबई येथे सन 1986 पासून आरोग्य सेवा तसेच असंसर्गजन्य रोग (जसे की कर्करोग, मधुमेह, रक्तदाब) इत्यादीवरील क्लिनिकल संशोधनात काम करत आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेली परिघीय संस्था आहे. सीसीआरएएस, नवी दिल्ली ही आयुर्वेदिक विज्ञानातील संशोधनासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च स्वायत्त संशोधन संस्था आहे.
या संदर्भात विविध मंत्रालये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि जगभरातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आयुष मंत्रालयाने सीसीआरएएसला केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि भूमी आरोग्यासाठी जनसंदेश, लोकसहभाग आणि लोकचळवळ निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रभारी सहायक निदेशक डॉ. आर.गोविंद रेड्डी यांनी पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अधिक माहितीसाठी संपर्क करा: 022-24927259, 24947822, 9820284671, ईमेल: ahini Interday.cerimurtioiingmon.cotn and huurestoday.org.in. या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
00000000
राजू धोत्रे/विसंअ