छत्रपती संभाजीनगर दि. 28 :- केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर, विजयनगर व भारतनगर परिसरात दाखल होताच या संकल्प यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतील विकासाची हमी असलेली गाडी महानगरात आली आहे. विकसित भारतात कोणीही गरीब राहू नये असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मीकांत थेटे, अंकुश पांढरे, विवेक राठोड, गोविंद केंद्रे, ॲड. ताराचंद गायकवाड, संजय जोरले, सागर प्रसाद, उपायुक्त अंकुश पांढरे, प्रशांत देशपांडे, अशोक दामले, मीनाताई पवार, मुकूंद फुलारे, भारत मोरे, संजय पाटील, संजय पाटील, संतोष देशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ.कराड यांच्या समवेत सर्वांनी एकत्रित विकसित भारताची शपथ घेतली. अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेची आधार अद्ययावत करणारे वाहन तसेच सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वल योजना, आरोग्य विभागाचे सर्वांसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, महानगरपालिकेचे हर घर जल, प्रधानमंत्री शहरी आवास योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत, अन्न सुरक्षा योजना आदी योजनांबाबत माहिती देणाऱ्या स्टॉलला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.