भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- मंत्री गुलाबराव पाटील

0
10

मुंबई, दि. 30 – रायगड जिल्ह्यातील भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

भोकरपाडा (ता. पनवेल) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पात 55 कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भातील प्रस्ताव भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. तसेच कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्ट्या देणे, वेतनवाढ आदी सुविधासंदर्भातील त्रुटी दूर करून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here