मुंबई, दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वीरशैव-लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेल्या संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी १४ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
सन २०२३-२४ या वर्षाकरिता पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेल्या वीरशैव – लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावेत. पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेले अर्ज सहायक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, मुंबई उपनगर कार्यालय, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-४०००७१ या पत्त्यावर दि. १४ मार्च २०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत करावेत. तद्नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
अधिक माहितीसाठी 022-25222023 या क्रमांकावर संपर्क साधावा.
****
शैलजा पाटील/विसंअ/