उमरखेड खंड एकमधील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : पृथ्वी मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या नोंदीनुसार दिनांक २१ मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ८ मिनीटांनी व ६ वाजून १९ मिनीटांनी अनुक्रमे ४.५ रिस्टर स्केल व ३.६ रिस्टर स्केल भुकंपाची नोंद झाली आहे.

तालुका स्तरावरील प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील उमरखेड खंड-१ मधील काही भागात सौम्य भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त असून कोणतीही जिवित व वित्त हानी झालेली नाही.

त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000