कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, मधील कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर  प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/