मुंबई, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांकडून तसेच पोलीस पथकांच्या कार्यवाही दरम्यान 10 लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय रोख रक्कम सोडवणूक समिती (कॅश रिलीज कमिटी) गठित करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ही गठित केली आहे. या रकमेच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांना या समितीकडे दाद मागता येईल.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खर्च नियंत्रण विषयांतर्गत रोख रक्कम सोडवणुकीसाठी ही समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये अंबरनाथ खुले (सहआयुक्त) हे समन्वयक व अध्यक्ष आणि विश्वास मोटे (सहायक आयुक्त, एम/पश्चिम विभाग) आणि विलास गांगुर्डे (अधिदान व लेखाधिकारी) हे सदस्य असतील.
या समिती कार्यालयाचा पत्ता हा महसूल भवन सभागृह, गुरुनानक रुग्णालयाच्या पाठीमागे, वांद्रे (पूर्व), मुंबई -400051 असा असून समिती कार्यालयाचा संपर्क क्रमांक 8657010873 असा आहे.
000
दीपक चव्हाण/विसंअ/