मतदान जागरुकतेसाठी नृत्यछटाचा आविष्कार

बीड, दि. 1 (जिमाका) निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदान करण्या जाऊ भारतासाठी..,… या गाण्यावर मतदान जागरुकतेसाठी  बीडमधील मुलींनी नृत्यछटेचा आविष्कार केला.

जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून मतदान जागरुकता उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आणि सोमवार दिनांक 13 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या निमित्ताने मतदारांना संदेश देण्यासाठी मतदान करण्यास जाऊ भारतासाठी…… या गाण्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणानंतर नृत्यछटेचे सादरीकरण केले.

हा नृत्य अविष्कार रिदम स्टाईल डान्स अकॅडमीचे नृत्य दिग्दर्शक सिद्धार्थ अग्रवाल आणि रिदम स्टाईल डान्स अकॅडमीच्या संचालिका स्वाती सिद्धार्थ अग्रवाल यांनी बसविला आहे. या नृत्यांमध्ये कु. श्रावणी नवले, कु. अवनी हजारे , कु. कार्तिकी वाघ ,कु. श्रीमयी ओहाळ , कु. अनुजा होरमाळे , कु. योगिता वरवडेकर यांनी हे नृत्य सादर केले.