मुंबई, दि. ५: ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंगळवार ७ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन ‘एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी, लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ, त्यांची मतदार संख्या, निवडणुकीत काम करणारे विविध विभाग, मतदार जनजागृती करण्यासाठी राबविलेला स्वीप उपक्रम, वंचित घटक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व बेघर मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमा, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असलेली काळजी, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नव मतदारांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आवाहन केले आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ/