मुंबई दि. ११ : नैसर्गिक आपत्तीत वीज पडून मृत्यू झाल्यास आपद्ग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत रुग्णांनाही मदत मिळण्याबाबत नैसर्गिक आपत्तीचा निकष लावावा, जेणेकरून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत मिळेलृ, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची नोंद होत नाही त्यामुळे याबाबतचा आढावा शासन स्तरावून घेण्यात यावा. तसेच उष्माघाताने मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदतीची तरतूद नसल्याने आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे उष्माघातातील रुग्णांना मदतीबाबत निकष ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
0000
संध्या गरवारे/विसंअ/