विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३९ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणुकीसाठीचे  मतदान आज होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३९ टक्के मतदान झाले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ७९,६४१ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी  ३५.६५ इतकी आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ४६,३७५ इतकी आहे. दुपारी  १  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ३८.३९ इतकी आहे

मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५,८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या ६,४११  इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची  टक्केवारी  ४०.४८ इतकी आहे

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या ३०,१५६ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ४३.४७ इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/