जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

0
15

जळगाव दि. 25 ( जिमाका ) गेल्या आर्थिक वर्षात 657 कोटीचा निधी विविध विकासकामांसाठी खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षात 755.99 कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यात विकास कामासाठी निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याची आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून लवकरच त्या बाबत नियोजन केले जाणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. सुरेश भोळे, आ. लता सोनावणे, सर्व अशासकीय सदस्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलु केजो, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी, विजय शिंदे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा खर्च

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 510.00 कोटी नियतव्यय मंजूर होता व त्यानुषंगाने संपुर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला होता. प्राप्त निधीमधून दिनांक 31 मार्च, 2024 अखेर रु. 510.00 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून संपूर्ण वितरित निधी खर्च झालेला आहे. किरकोळ रु. 4000/- इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर तांत्रिक कारणास्तव पुनर्विनियोजन करता येत नसल्याकारणाने शासन स्तरावर समर्पित करण्यात आलेला आहे.

अनुसुचित जाती उपयोजना

जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 92.00 कोटी नियतव्यय मंजूर होता व त्या अनुषंगाने दिनांक 31 मार्च, 2024 अखेर रु. 92.00 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून संपूर्ण वितरित निधी खर्च झालेला आहे.

आदिवासी घटक कार्यक्रम

जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 55.92 कोटी नियतव्यय मंजूर होता व त्यानुषंगाने संपूर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला होता. प्राप्त निधीमधून दिनांक 31 मार्च, 2024 अखेर रु. 55.92 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून संपुर्ण वितरित निधी खर्च झालेला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) व जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना) अंतर्गत सन 2023-24 करिता खर्चाची टक्केवारी ही 100.00 टक्के इतकी आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गत दिनांक 31 मार्च, 2024 अखेर खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे.

मंजूर नियतव्यय सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकूण 657.92

अर्थसंकल्पीत तरतुद सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकूण 657.92

BDS वर प्राप्त निधी सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकूण 657.92

यंत्रणांना वितरित निधी सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकूण 657.92

31 मार्च, 2024 पर्यंत खर्च सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकूण 657.92

आणि वितरित तरतुदीशी खर्चाची टक्केवारी ही सर्वसाधारण 100.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 100.00 आदिवासी उपयोजना (TSP) 100.00 आदिवासी उपयोजना (OTSP) 100.00 असे एकूण 100.00

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा खर्च

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 607.00 कोटी नियतव्यय मंजूर आहे. मंजूर नियतव्ययापैकी रु. 202.31 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 25.02 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून रु. 11.63 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.

अनुसुचित जाती उपयोजना

जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 93.00 कोटी नियतव्यय मंजूर आहे. मंजूर नियतव्ययापैकी रु. 30.69 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 15.45 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून रु. 15.45 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.

आदिवासी घटक कार्यक्रम

जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 26.09 कोटी नियतव्यय मंजूर असून त्यानुषंगाने रु. 8.70 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 1.21 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून कार्यान्वयीन यंत्रणा स्तरावर संपुर्ण निधी खर्च झालेला आहे.

तसेच जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 29.90 कोटी नियतव्यय मंजूर असून त्यानुषंगाने रु. 9.97 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 0.06 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला असून रु. 0.04 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत दिनांक 24 जुलै, 2024 अखेर खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे.

मंजूर नियतव्यय सर्वसाधारण 607.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 93.00 आदिवासी उपयोजना (TSP) 26.09 आदिवासी उपयोजना (OTSP) 29.90 असे एकूण 755.99

अर्थसंकल्पीत तरतूद सर्वसाधारण 607.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 93.00 आदिवासी उपयोजना (TSP) 26.09 आदिवासी उपयोजना (OTSP) 29.90 असे एकूण 755.99

BDS वर प्राप्त निधी सर्वसाधारण 202.31, अनुसुचित जाती उपयोजना(SCP) 30.69 आदिवासी उपयोजना (TSP) 8.70 आदिवासी उपयोजना (OTSP) 9.97 असे एकूण 251.66

यंत्रणांना वितरित निधी सर्वसाधारण 25.02, अनुसुचित जाती उपयोजना(SCP) 15.45 आदिवासी उपयोजना (TSP) 1.21 आदिवासी उपयोजना (OTSP) 0.06 असे एकूण 41.74

24 जुलै, 2024 पर्यंत खर्च सर्वसाधारण 11.63, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 15.45 आदिवासी उपयोजना (TSP) 1.21 आदिवासी उपयोजना (OTSP) 0.05 असे एकूण 28.34

आणि वितरित तरतूदीशी खर्चाची टक्केवारी ही सर्वसाधारण 12.37, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 50.34 आदिवासी उपयोजना (TSP) 13.91 आदिवासी उपयोजना (OTSP) 0.60 असे एकूण 16.59

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे पुनर्विनियोजन (अंतिम सुधारित तरतूद)

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 510.00 कोटी नियतव्यय मंजूर होता. काही योजनांतर्गत मोठी कामे मंजूर केल्याने व अशी कामे पूर्ण न झाल्याने त्याचप्रमाणे काही योजनांमध्ये मागणी प्राप्त न झाल्याने रु. 65.18 लक्ष रकमेची बचत होती. सदर बचत आवश्यकतेनुसार ज्या योजनांमध्ये प्राधान्याने कामे घेण्याची आवश्यकता आहे अशा कामांसाठी वळती करण्यात आली. त्याबाबत क्षेत्रनिहाय तपशील खालीलप्रमाणे.

महसुली गाभा क्षेत्रात झालेली बचत 37.12 आणि जादा मागणी 47.99

महसुली बिगर गाभा क्षेत्रात झालेली बचत 14.42 आणि जादा मागणी 3.56

भांडवली गाभा क्षेत्रात झालेली बचत 10.3 आणि जादा मागणी 10.93

भांडवली बिगर गाभा क्षेत्रात झालेली बचत 3.61 आणि जादा मागणी 2.70

एकूण पुनर्विनियोजनात झालेली बचत 65.18 आणि जादा मागणी 65.18

अनुसुचित जाती उपयोजना

जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 92.00 कोटी नियतव्यय मंजूर होता. योजने अंतर्गत काही योजनांसाठी रु. 64.69 लक्ष इतक्या रकमेची बचत झाली व सदर बचत पुनर्विनियोजनाद्वारे आवश्यकतेनुसार इतर योजनांकडे वळती करण्यात आलेली आहे.

आदिवासी घटक कार्यक्रम

जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 55.92 कोटी नियतव्यय मंजूर होता. कार्यान्वयीन यंत्रणांकडून निधी मागणी प्राप्त न झाल्याने तसेच काही योजनांसाठी आवश्यकतेनुसार प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर रु. 3.67 लक्ष रकमेची बचत झाली व झालेली बचत आवश्यकतेनुसार इतर योजनांकडे वळती केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here