मुंबई दि.२८ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खाजगी उद्योजकांकडून राज्यात प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी दहा उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील ईबिक्सकॅश ग्लोबल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (EBIXCASH GLOBAL SERVICES PVT. LTD) या खाजगी आस्थापनेने कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate) हिंदी आणि इंग्रजी या पदाकरीता खाजगी आस्थापनेतून महाराष्ट्रातून प्रथमच दहा प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड करून नियुक्ती दिली आहे.
स्नेहा बिडलांग, प्रविण शिंदे, तेजस्वी बनकर, फहाद खान, जितेंद्र यादव, रचना कांबळे, अक्षदा कांबळे, सुभाष अवघडे, शिवम पांडे, श्याम शिंदे या उमेदवाराची निवड झालेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थीची निवड करणारी ही महाराष्ट्रातील पहिली खाजगी आस्थापना ठरली आहे.
या योजनेत मुंबई उपनगर जिल्ह्यात वीस हजार उमेदवारांचे नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारास त्यांच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे म्हणजे बारावी पास रू.६०००/- आयटीआय, डिप्लोमा रू,८०००/- आणि पदवीधर इंजीनियरिंग साठी रू.१०,०००/- इतके विद्यावेतन ६ महिन्यांसाठी शासनाकडून मिळणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका तसेच खाजगी आस्थापना, उद्योजक, सेवा क्षेत्रातील उद्योजक या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी www. mahaswayam.gov.in या विभागाच्या वेबसाईटवर करून मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.
000