अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांच्या हस्ते २ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण

0
23

मुंबई,दि. १२ : केंद्र पुरस्कृत ‘एक पेड मॉ के नाम ‘ आणि ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ या अभियानांतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी परिसरात प्रत्येक बालकांच्या नावे एक झाड  लावण्यात येत आहे.  आजपर्यंत अंगणवाडी केंद्रांमध्ये २ लाख ६१ हजार ८३१ रोपांचे बालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.

१ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या हस्ते लावण्यात येणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असणार आहे. या अभियानासाठी विशेष मेहनत घेतलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे एकात्मिक बाल सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी अभिनंदन केले आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here