शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाच्या जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
14

सातारा, दि. 14 (जि.मा.का.) :  सातारा तालुक्यातील आरे गाव येथे शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानासाठी जागेचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. यासंदर्भात त्यांच्या मातोश्री कालिंदी महाडिक व चुलत बंधू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली.

आरे गाव येथे शहीद कर्नल  संतोष महाडिक यांच्या स्मृती उद्यानासाठी 37 गुंठे जमीन देण्यात येणार आहे. या ठिकाणी महसूल विभागाने त्वरित भेट देऊन जमीन मोजणी करुन द्यावी व सरकारी आदेश काढावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री स्वत: इतके वर्ष याविषयी पाठपुरावा करीत आहेत. यंत्रणेने हा विषयक प्रधान्याने व  संवेदनशीलपणे मार्गी लावावा, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले. यावेळी त्यांनी श्रीमती कालिंदी महाडिक यांना अत्यंत आदराने बोलावून घेत त्यांचा विषय ऐकून घेतला आणि महसूल विभागाला तत्काळ स्थळ पाहणीच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर येणाऱ्या 15 ऑगस्टपासून वॉर मेमोरियलला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या दिवशी अभिवादन करण्याची प्रथा जिल्ह्यात सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here