‘भारतीय न्याय संहिता’ या विषयावर ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

0
90

मुंबई, दि.२५ :  देशात १ जुलै २०२४ पासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले असून भारतीय न्याय संहिता व अन्य कायद्यांबाबत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची मुलाखत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी देशात १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत, सोमवार दि.२६ आणि मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—— 000 —–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here