२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेतील सत्रे

मुंबई, दि. ३ :  ई-गव्हर्नन्सची २७ वी राष्ट्रीय  परिषद ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिओ कन्वेशन सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली. या परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारातील वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञान तज्ज्ञ, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले.

या परिषदेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन तसेच केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास, केंद्रीय सचिव एस. कृष्णन, अतिरिक्त सचिव पुनीत यादव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.

ई-गव्हर्नन्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सुशासनाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी यावेळी विविध सत्रात चर्चा झाली.

पहिल्या सत्रात ‘विकसित भारत’ करिता डिजीयात्रा, डिजीलॉकर आणि उमंग, यू.पी.आय., आधार आणि ओ.एन.डी.सी. या  डिजिटल पब्लिक  इन्फ्रास्ट्रक्चर विषयावर सविस्तर चर्चा झाली. या सत्राचे अध्यक्षपद मैत्री सचिव एस. कृष्णन यांनी भूषविले.  एन.आय.एस.जी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बन्सल, एन. ई.जी. डी.चे अध्यक्ष तथा सीईओ नंद कुमारन, मैत्रीचे सहसचिव संकेत भोंडवे आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सचे सीईओ टी.कोशी यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात “शेपिंग सर्व्हिस डिलिव्हरी फॉर टुमारो” या विषयावर चर्चा झाली. या सत्राचे अध्यक्षपद केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास यांनी भूषविले. या सत्रात वित्त मंत्रालयाचे कंट्रोलर जनरल एस. एस.दुबे, पी. डब्लू.सी.चे संतोष मिश्रा, शासकीय सल्लागार एनएसएन मूर्ती आणि आय आय टी चे प्राध्यापक निशिथ श्रीवास्तव यांनी सहभाग नोंदविला.

ब्रेकआऊट सत्राच्या पहिल्या सत्रात राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सुवर्ण आणि रजत पारितोषिक प्राप्त  प्रकल्प जसे पोषण ट्रेकर, शिक्षा सेतू, ओ.एन. डी.सी., कृत्रिम बुद्धिमत्ता, हायपर टेन्शन कंट्रोल आणि कर्नाटक जीआयएस यावर चर्चा आणि मार्गदर्शन झाले. यात सत्रात आयआयपीएचे संचालक एस.एन.त्रिपाठी, महिला व बाल कल्याण मंत्रालयाचे माजी सचिव इंदेवर पांडे, आसाम समग्र शिक्षाचे संचालक डॉ.ओम प्रकाश, उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव संजीव, राजस्थान सरकारचे पेयजल व्यवस्था विभागाचे सचिव डॉ.समित शर्मा, आय.सी.एम.आर.चे शास्त्रज्ञ गणेशकुमार परशुरामन  आणि कर्नाटक  राज्याचे माजी संचालक डॉ. डी.के. प्रभूराज यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेकआऊटच्या दुसऱ्या सत्रात भविष्यातील ई गव्हर्नन्स सेवेबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यात अग्री स्टॅकचे अधिकारी राजीव चावला, सी. बी.सी.चे सदस्य डॉ.आर. बाला सुब्रमण्यम, मैत्रीचे माजी सचिव जे.सत्यनारायण, ओडिसा सरकारचे राज्यपालांचे प्रधान सचिव  एन.बी. एस.राजपूत आणि आय. आय.पी. ए.चे सल्लागार राखी बक्षी यांनी मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या सत्रात  मैत्रीचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग, डी.ओ.आय.टी.चे आयुक्त इंदरजित सिंग,  झारखंडचे माजी सचिव डॉ.मनीष रंजन, प्रधान शास्त्रज्ञ डॉ.नीरज सूद आणि डी.ओ.आर.डी.चे माजी सहसचिव अमित कटारिया यांनी मार्गदर्शन केले.

000

संजय ओरके/विसंअ