राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा संरक्षणा’वर भर

मुंबई, दि. 3 : ई-गव्हर्नन्सची २७ वी राष्ट्रीय  परिषद ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिओ कन्वहेक्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात “डेटा गव्हर्नन्स प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन डिजिटल एज” या विषयावर चर्चासत्र झाली. यामध्ये युआयडीएआयचे सीईओ अमित अगरवाल, ग्लोबलचे सीईओ परेश शाह, 3 आय इन्फोटेकचे  ऋषी अगरवाल, नॅसकॉमचे अच्युत घोष, इझीगोव्हचे व्यवस्थापकीय संचालक अमित शुक्ला सहभागी झाले होते.

दुसऱ्या सत्रात प्रशासनामधील कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा झाली. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनात  वापर या विषयावर माहिती देण्यात आली. यात आयआयटी गुडगावच्या अंजली कौशिक, आय.एम.एम. इंदोरचे प्रशांत सलवान (दूरदृष्य प्रणालीद्वारे), जियोचे डॉ. शैलेश कुमार, ग्रँट थोरंटन भारतचे प्रसाद उन्नीकृष्णन यांनी मार्गदर्शन केले.

या परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सॅपचे लवनिश चन्ना, एन.आय.सी.च्या सपना कपूर, प्रेमसचे व्यवस्थापकीय संचालक देवरूप धर, ग्रँट थोरंटन भारतचे रामेंद्र वर्मा यांनी सहभाग घेतला.

000

संजय ओरके/विसंअ