शासनमान्य अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनी अनुदानासाठी १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
14

मुंबई दि.५ : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत “धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना – सन २०२४-२५” राबविण्यात येत आहे.इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर, २०२४ आहे. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांचेकडे  सादर करावा. योजनेबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर, २०२४ आहे. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून त्रुटींची पुर्तता करून अंतिमरित्या पात्र प्रस्ताव शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत राहील. अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here