बोरगेवाडीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. 12 (जिमाका) : पाटण तालुक्यातील मेंढोशी अंतर्गत बोरगेवाडी 90 कुटुंबांची संख्या आहे. यांच्या पुनर्वसनाचा प्रस‌्ताव प्रशासनाने तात्काळ तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
‍बोरगेवाडी गावच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिलहाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते.
बोरगेवाडीच्या पुनर्वसनाबाबत 2023 साली तपासणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पुनर्वसन जलद गतीने होण्यासाठी प्रशासनाने जागेची पहाणी करावी. मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी मागणी केली जाईल. त्यासाठी पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
0000