पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला पाटण तालुक्यातील लाडक्या बहिणींशी संवाद

सातारा, दि. 12 (जिमाका) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. पाटण तालुक्यातील या योजनेच्या लाडक्या बहिणींशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या घरी जावून संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी लाडक्या बहिणींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सातारा जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले आहे. लाडक्या  बहिणीनां कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्रशासनातील कर्मचारी तुमच्या घरापर्यंत पोहचून तुमचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

शासनाने महिलांचा विचार करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का? पैसे जमा झाल्याचा मेसेज आला का? अशी विचारणा करुन मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना सांगितले.

00000