मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक व ११४ साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र गणपती मालिकेचे ५० लाखाचे तर सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी सोडतीमधून प्रथम क्रमांकाचे सात लाखांची एकूण आठ बक्षीसे जाहीर झाली आहेत. तसेच एकूण एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विविध रकमेच्या तिकिटांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी दिली आहे.
सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम १० हजारावरील बक्षिसाची मागणी वाय ए -१, अतिरिक्त शॉप कम गोडऊन, एपीएमसी मार्केट, सेक्टर १९ बी, वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे करावी. रक्कम दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडे करावी. अधिक माहितीसाठी ०२२-२७८४६७२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे उपसंचालक यांनी सांगितले आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र गणपती, महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गणपती विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र गणपती मालिका तिकिट क्रमांक GBOO/29466 या समित एजन्सी, मुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्र सोडतीमधून रक्कम रू सात लाखाचे प्रथम क्रमांकाचे आठ बक्षिसे जाहीर झाली आहेत. २२६०७ तिकीटांना रू. एक कोटी पाच लाख ६४ हजार व साप्ताहिक सोडतीतून १८६१४ तिकीटांना रूपये एक कोटी पाच लाख एक हजार ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/