फुलांची उधळण करणाऱ्या जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून मतदान जनजागृती

सातारा दि.26 :- पुलांची उधळण करणऱ्या व जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजगृती केली.
सध्या कास पठरावर पुलांचा बहार आला आहे या अनुषंगाने पर्यटन कास पठरावर येत आहेत. याचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जनजागृती केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी   अर्चना वाघमारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी   सतीश बुद्धे, उपशिक्षणाधिकारी श्री रवींद्र खंदारे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या,जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी समजाती   नागरिकांनी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजवावा.   भारत हा पहिलाच देश आहे की स्वातंत्र्यानंतर  सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे.  मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे म्हणून सुट्टी जाहीर करण्यात येते. परंतु अनेक मतदार सुट्टी असूनही मतदान करत नाही. घटनेने आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार मुलभूत असून मतदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व हक्क आहे, असेही त्यांनी सांगितले.
00000