नागपूर, दि. १६ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री, राज्यमंत्री व नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.
यामध्ये मंत्री म्हणून सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, ॲड. आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, ॲड. माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर – साकोरे, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांचा समावेश होता.
नवनियुक्त सदस्यांचा परिचय
तसेच भावना गवळी, प्रज्ञा सातव, परिणय फुके, योगेश टिळेकर या सदस्यांसह राज्यपाल नियुक्त सदस्य धर्मगुरू बाबुसिंग राठोड या सदस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला परिचय करून दिला.
०००००