नागपूर, दि. 18 : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ/