नागपूर, दि. 25 : दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, उपायुक्त कमल किशोर फुटाणे, सहायक महसूल अधिकारी अमित हाडके तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0000