जळगाव दि.२६ (जिमाका): भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाच निवडक प्रतिनिधींना संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या. या विशेष उपक्रमाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.
संविधान उद्देशिका प्रतिनिधिक स्वरूपात ज्यांना देण्यात आल्या त्यात तृतीयपंथीय समुदायाचे प्रतिनिधी म्हणून श्री.मानव सुरेश इंगळे, खडगाव, ता. जामनेर येथील वाघूर प्रकल्पामुळे घर संपादित झालेले प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून श्री.समाधान लोटू माळी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मौजे मेलाने, ता. चोपडा येथील सरपंच श्रीमती. लालबाई प्रताप पावरा, जि. प. शाळा पिलखेडे ता जळगाव येथे शिक्षण घेत असलेली मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कु. मेघना विक्रम भालेराव, सिंधी समाजातील विद्यार्थिनी डॉ. नान्सी मुकेश सदमानी हिला भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेले आहे.
0 0 0 0