बारामती, दि. १: महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानाअंतर्गत नगरपरिषदेत नव्याने दाखल होणाऱ्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.
या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाच्या पाण्याच्या टाकीची क्षमता ५ हजार लिटर आहे. पाणी फेकण्याची क्षमता ८ मजल्यापर्यंत आणि ती सरळ रेषेत ४५ मीटरपर्यंत आहे. फोम टाकीची क्षमता ५०० लिटर आहे. २० किलोग्रॅमचे २ डीसीपी सिलेंडर, साडेबावीस किलोग्रॅमचे कार्बन डाय ऑक्साईड (सीओ-२) सिलेंडर आहे. ३६० डिग्री सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय, उच्चतम व्हिडीओ प्रणाली आहे. या अत्याधुनिक वाहनाचा वापर ए, बी, आणि सी प्रकारची आग विझविण्यासाठी होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी श्री. रोकडे यांनी दिली आहे.
0000