सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प – माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि.1 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश “विरासत के साथ विकास” अशी घोडदौड करीत असताना आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणारा आहे.

हा जनता जनार्दनासाठीचा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे मिशन पूर्णत्वास नेणारा अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांच्या हिताला महत्त्व देत निर्माण केलेली नवी कर रचना पाहता देशाच्या नागरिकांना विकासाचे भागिदार बनवणारा अर्थसंकल्प आहे.

ग्रामीण व्यवस्थेतील नवी क्रांती निर्माण करणारा अर्थसंकल्प तसेच नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अर्थसंकल्पातून हे परावर्तित होत आहे. देशातील महिलांना सक्षम करणारा अर्थसंकल्प आहे. तसेच तो शेतकऱ्यांना भरघोस निधी उपलब्ध करून देणारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देणारा अर्थसंकल्प आहे.

अशा प्रकारे सर्व भारतीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार मानले आहेत.

0000