मुंबई, दि.६ : नागपूर जिल्ह्यातील कामठी छावणी परिषद पाणी पुरवठा प्रकल्पासाठीचा उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत १०.३८ कोटी रुपये किंमतीच्या कामठी छावणी परिषद पाणीपुरवठा प्रकल्पास दि. २९ ऑगस्ट, २०१९ रोजी शासनाने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाच्या कामाचा श्री. बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या प्रकल्पात राज्य शासनाचे अनुज्ञेय अनुदान ९.३४२ कोटी रुपये (९०%) आणि कटक मंडळाचा स्वहिस्सा १.०३८ कोटी रुपये (१०%) इतका आहे.
या प्रकल्पास शासनाद्वारे प्रकल्पाचा रुपये ३.११४ कोटी रकमेचा पहिला हफ्ता १ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या व ३.११ कोटी रुपयांचा दुसरा हफ्ता ३ जुलै, २०२३ रोजी वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच, या प्रकल्पाच्या तिसऱ्या हप्त्यापोटीचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत शासनास प्राप्त झाला असून त्याअनुषंगाने निधीच्या उपलब्धतेनुसार ०.४३ कोटी रुपयांचा निधी २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधीसाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येऊन निधी उपलब्ध होताच कामठी कटक मंडळाच्या या प्रकल्पास निधी वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी नगरविकास विभागामार्फत देण्यात आली.
00000
बी.सी.झंवर/विसंअ