आदिवासी विकास विभागातील क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न
नागपूर,दि. २१ : आदिवासी विकास विभागामध्ये खेळाला विशेष महत्व असून दैनंदीन जीवनात खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे शासकीय कामकाजात सुद्धा सुधारणा होत असते, असे असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प अधिकारी नितीन ईसोकर, लेखाधिकारी संजना पेंडके, सहा. लेखाधिकारी विनोद बोरघाटे, नियोजन अधिकारी माधुरी नासरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय मैदान येथे क्रीडा स्पर्धा व विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, नागपूर येथे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.
मैदानी खेळामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल या खेळाचा समावेश होता तर इनडोअर खेळामध्ये बुद्धीबळ, कॅरम, संगीत खुर्ची, मटकी फोळ, इत्यादी खेळांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सामूहिक नृत्य, वैयक्तीक नृत्य, गायन, वेशभुषा, कविता, नाटक आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या क्रीडास्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमाकरिता नागपूर विभागातील प्रकल्प कार्यालय नागपूर अधिनस्त सर्व शासकिय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकिय वसतिगृहातील गृहपाल व कर्मचारी, अपर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, प्रकल्प कार्यालय नागपूर, चिमुर, वर्धा, देवरी , अनु. जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर तसेच शबरी आदिवासी महामंडळ, नागपूर येथील जवळपास ३५० कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला होता.
00000