मुंबई दि.२३- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी कालपर्यंत ४९८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल
■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – २०६ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २६ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५८ गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६१ आरोपींना अटक.
■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ पुणे ग्रामीण या पोलीस जिल्ह्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा राजकीय आशयाचा मजकूर असणारी पोस्ट सोशल मिडियावरून शेअर केली होती ,त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
००००००
वि. सं.अ- डॉ. राजू पाटोदकर.