महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा उत्साहात

शांतता अबाधित ठेवून प्रगतीकडे वाटचाल - पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- दहशतवादाचा सक्षमतेने मुकाबला करत असतांना देशांतर्गत शांतता व लोकशाही अबाधित राखून देश आणि राज्य प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करीत आहे. न्याय, समता, शांतता, बंधुता या मूलभूत तत्त्वांचा अंगीकार करत नागरिकांनी  सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेम अबाधित ठेवावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाचा सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदिपान  भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच प्रशासनातील अन्य अधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पहेलगाम येथे दहशतवादी ल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना पालकमंत्री शिरसाट यांनी श्रद्धांजली अर्पण केली.  त्यांच्या कुटुंबयांप्रति संवेदना व्यक्त करून  पालकमंत्री शिरसाट म्हणाले की,      भारत देश हा बलाढ्य आणि विकसनशील देश असून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्ह्याची विकासाकडे अग्रेसर असून उद्योग, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून त्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे. जिल्ह्यात कामगारांना विविध योजनेत २६४ कोटी ४४ लक्ष ९३  हजार रुपयांचा लाभ देण्यात आला असून आरोग्य,आवास योजना, शिक्षण,ग्रामविकास, आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यासह लघुउद्योग आणि व्यवसायासाठी जिल्ह्यामध्ये भरीव निधीची तरतूद केली आहे. कायदा सुव्यवस्था आणि शांततेसाठीही पोलीस प्रशासनास अद्यावत वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून. या विकास प्रक्रियेत सर्व नागरिक, प्रशासकीय अधिकारी व सर्व घटकांनी सहभागी होऊन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करू या, असे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले.

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विविध प्रशासकीय कामगिरी बद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यामध्ये १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळा

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांची नावे याप्रमाणे-

१.      राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व उपविभागीय कार्यालय कन्नड.

२.      पोलीस पदके-  संदीप अनंतराव पाटोळे लाचरुत प्रतिबंधक विभाग स्वाती भोर अशोक भंडारे गीता बागवडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक. पोलीस हवालदार यांचाही सन्मान करण्यात आला.

३.      आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, सजा बाजारात सावंगी तालुका खुलताबाद येथील नारायण पठ्ठे.

४.    संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार (सन २०२३-२४) प्रथम ग्रामपंचायत पुरस्कार सोयगाव तालुक्यातील जरंडी, द्वितीय पुरस्कार कन्नड तालुक्यातील नादरपुर ग्रामपंचायत, तृतीय पुरस्कार तालुका छत्रपती संभाजी नगर मधील दुधड ग्रामपंचायत, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मध्ये छत्रपती संभाजी नगर मधील ग्रामपंचायत वाहेगाव वळदगाव व ग्रामपंचायत करोडी वितरित करण्यात आले.

५.     पोलीस अधीक्षक संदीप अनंतराव आटोळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

६.      पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती रामराव भोर, लोहमार्ग

७.     पोलीस निरीक्षक अशोक रामलू भंडारे, पोलीस आयुक्तालय

८.     पोलीस निरीक्षक श्रीमती गीता मोतीचंद बागवडे, पोलीस आयुक्तालय

९.      पोलीस निरीक्षक शरद बाबुराव जोगदंड, लोहमार्ग,पोलीस आयुक्तालय

१०.   पोलीस उपनिरीक्षक इसाक उस्मानखान पठाण, पोलीस आयुक्तालय

११.   पोलीस उपनिरीक्षक दिपक परदेशी, पोलीस आयुक्तालय

१२.  पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुरुड, पोलीस आयुक्तालय

१३.   पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब खान मोहमद, पोलीस आयुक्तालय

१४. पोलीस उपनिरीक्षक संजय जानुजी जोगदंड, पोलीस आयुक्तालय

१५.  सहा.पो.उपनिरीक्षक विष्णु लक्ष्मणराव उगले,पोलीस आयुक्तालय

१६.  पोलीस हवालदार मुश्ताक गफूर शेख, पोलीस आयुक्तालय

१७.  पोलीस हवालदार मच्छीन्द्रंनाथ रंगानाथ जाधव, पोलीस आयुक्तालय

१८.  पोलीस हवालदार विठ्ठल विनायकराव मानकापे, पोलीस आयुक्तालय

१९.   पोलीस हवालदार संतोष लोंढे, पोलीस आयुक्तालय

२०.  पोलीस हवालदार शिवाजी राजाराम कचरे, पोलीस आयुक्तालय

२१.  पोलीस हवालदार प्रभाकर साहेबराव राऊत, पोलीस आयुक्तालय

२२. पोलीस हवालदार कैलास तेजराव गाडेकर, पोलीस आयुक्तालय

२३.  पोलीस हवालदार राजेंन्द्र देविदास चौधरी, पोलीस आयुक्तालय

२४.पोलीस हवालदार मो.इरफान मो.इसाकखान, पोलीस आयुक्तालय

२५. पोलीस हवालदार लक्ष्मण दशरथ किर्तीकर, पोलीस आयुक्तालय

२६. पोलीस हवालदार सुनिल सुरेश बेलकर, पोलीस आयुक्तालय

२७. पोलीस उपनिरीक्षक शाकिल अहेमद शेख रहीम शेख, ग्रामीण

२८. पोलीस उपनिरीक्षक गफारखान सरोवरखान पठाण, ग्रामीण

२९.  सहा. पो.उप.निरीक्षक खालेद हबीब शेख, ग्रामीण

३०.  पोलीस हवालदार अफसर खाजा शेख, ग्रामीण

३१.   पोलीस हवालदार राजु बबनराव खरात, ग्रामीण

३२.  पोलीस हवालदार विश्वास प्रल्हाद नागरे, रा.रा. पो. बल गट क्र.14 छत्रपती संभाजीनगर

३३.  पोलीस अंमलदार अशोक परशुराम पवार, रा. पो. बल गट क्र.14 छत्रपती संभाजीनगर

३४. पोलीस अंमलदार दिनेश शामराव ढगे, रा.रा. पो. बल गट क्र.14 छत्रपती संभाजीनगर

 

पोलीस दलाच्या ताफ्यात ३३ वाहने

ध्वजारोहण समारंभ नंतर पोलीस विभागासाठी अद्यावत ३३ वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात चारचाकी वाहने, बसेस, दुचाकी वाहने यांचा समावेश असुन गतिमान तपास यंत्रणा व कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये या वाहनांचा उपयोग होईल असा विश्वास पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केला. पोलीस दलातील विविध पथकांचे मानवंदना स्वीकारून नंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी मान्यवरांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

००००००