आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

मुंबई, दि. १६ : प्लास्टिक कचऱ्याने परिसर विद्रुप होत आहेत. मात्र सिक्कीम देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांसाठी अनुकरणीय असून युवकांनी किमान आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला तर देश अधिक सुजलाम सुफलाम होईलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे साजरा झाला. एक भारत श्रेष्ठ भारत‘ उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सिक्कीम राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले.

साधारण तीन दशकांपूर्वी देशात प्लास्टिक – पॉलिथिन बॅग वापरण्याचे प्रचलन नव्हते. प्लास्टिक न वापरल्यामुळे कुणाचेही फारसे काम अडतही नव्हते. आज मात्र लोक खरेदीसाठी बाहेर जाताना कापडी पिशवी नेत नाही. प्रत्येक वस्तू प्लास्टिक बॅगमध्ये आणली जाते. या स्थितीचा विचार करून युवकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा व बाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत बाळगावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केली.

सिक्कीम व इतर उत्तरपूर्व राज्याचे सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा तसूभर देखील कमी नाही. त्या देशापेक्षा कितीतरी पटीने नैसर्गिक सौंदर्य भारतात आहे. उत्तम मार्केटिंग मुळे  काही देश पर्यटनात पुढे गेले आहे.  लोकांनी सिक्कीमसह उत्तरपूर्व राज्ये तसेच जम्मू काश्मीरहिमाचल प्रदेश या राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. भारतात नद्यागडकिल्लेवारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे आपण जगातील अर्धे पर्यटक आकर्षित करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण देशातील लोकांमध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेमुळे सिंदूर‘ मोहिम प्रभावी ठरली. लोकांनी एकता टिकवून ठेवली तर भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचे लोकनृत्य  घोंटू व लोकगीत लेपचा तसेच सिक्कीमचे राज्यगीत उत्कृष्ट सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलदीप जठार व श्रद्धा चराटकर या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सिक्कीम येथील तरुणीचे सुंदर चित्र साकारल्याबद्दल तसेच ओंकार गोमासे या विद्यार्थ्याने सिक्कीम येथील लोकजीवनाचे तैलचित्र काढल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे विशेष कौतुक केले. 

विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट  सिक्कीम या पॅराडाईज ऑफ इंडिया‘ यावेळी दाखविण्यात आला.

राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अवर सचिव सुशील  मोरे यांनी  आभार मानले.

कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्केप्र-कुलगुरु पी. एस. पाटीलकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदेव्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादरीकरण केल्याबददल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

**

Maharashtra Raj Bhavan celebrates Sikkim State Foundation Day

Governor appeals to youth to make their neighbourhood ‘plastic free’

The 50th Anniversary of the State Foundation Day of Sikkim was celebrated at Maharashtra Raj Bhavan Mumbai in presence of Maharashtra Governor and Chancellor of State Universities C.P. Radhakrishnan on Fri (16 May). The Sikkim State Foundation Day was organised as part of Ek Bharat Shreshtha Bharat initiative of Government of India.

The Sikkim State Foundation was organised by Maharashtra Raj Bhavan as part of the Ek Bharat Shreshtha Bharat initiative of Government of India.

Observing that plastic waste has littered the country from Kashmir to Kanyakumari, the Governor called upon the youth to follow the example of ‘plastic free’ Sikkim State and keep their neighbourhood plastic free.

The Governor applauded Sikkim for becoming the State with the least use of plastic and for promoting organic farming.

The Governor applauded the students Kuldeep Jathar and Shraddha Charatkar for their beautiful rangoli of a Sikkim woman and patted Omkar Gomase for his painting of the monuments and life of the Sikkimese people.

The Cultural team of the University presented the Ghantu folk dance, Lepcha folk song and Lepcha Folk Dance of Sikkim on the occasion.  An audio visual film showcasing the beauty, history and  heritage of Sikkim made by the students of the Media department of the University was also shown on the occasion.

Secretary to the Governor Dr Prashant Narnaware delivered the welcome address, while Under Secretary Sushil More proposed a vote of thanks.

Vice Chancellor of Shivaji University Prof D. T. Shirke, Pro Vice Chancellor P S Patil, Registrar Dr V N Shinde, members of the Management Council of the University, students and members of the cultural team of the University were present.

0000