मुंबई, दि. 20 : सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना कामगार मंत्री ॲड . आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.
ही दुर्घटना संपूर्ण जिल्ह्यास हादरवून सोडणारी असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा संचालनालयातील अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेतील मयत कामगारांना कायद्याप्रमाणे सर्व लाभ मिळवून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले
याशिवाय अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून सोलापूर एमआयडीसीतील अतिधोकादायक, धोकादायक आणि रासायनिक कारखान्यांचे विशेष पथकाद्वारे ऑडिट करण्यात येणार असल्याचेही कामगार मंत्री ॲड .फुंडकर यांनी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ/