वन विभागाच्या सौंदर्यीकरणासह सशक्तीकरण आणि मजबुतीकरणावर विशेष भर – वनमंत्री गणेश नाईक

रायगड(जिमाका)दि.22: -वनपरिक्षेत्र अधिकारी, माथेरान कार्यालय व तपासणी नाका या नूतन इमारतीचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. वनमंत्री या नात्याने वनविभागाचे सौंदर्यीकरण, सशक्तीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कर्जत येथील माथेरान वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथील तपासणी नाका यांचे उद्घाटनसोहळ्यास आ.महेंद्र थोरवे ,राज्याचे प्रधान सचिव वन बाल प्रमुख शोमिता विश्वास, मुख्य वन संरक्षक ठाणे के प्रदिपा, उप वन संरक्षक राहुल पाटील, प्रांताधिकारी प्रकाश संकपाल, पनवेल माजी नगराध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, माझे वन ही शासनाची नाविन्यपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून  प्रत्येक रेंजमध्ये सुरंगी आणि बहाडोली या जांभळाच्या  जातीची झाडे 100 एकर मध्ये  लावा. या योजनेमध्ये प्रत्येक कार्यरत वन कर्मचारी यांनी वन विभागाचे कार्यक्षेत्रातील वनांपैकी कोणतेही 1 एकर क्षेत्राची निवड करुन सन 2025 चे पावसाळयांत, स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांच्या पसंतीच्या  वृक्षांची लागवड करावयाची आहे. तसेच निश्चित केलेल्या क्षेत्रातील वृक्षांचे संपूर्ण संरक्षण व संगोपन करण्याचे आहे. या योजनेंतर्गत वनीकरण केल्यास एकूण कार्यरत पदांप्रमाणे साधारणतः 338 एकर क्षेत्रावर सन 2025 चे पावसाळयात वनीकरण होणार आहे. “माझे वन” योजनेमुळे वनीकरणावर वैयक्तिक दृष्ट्या लक्ष दिले जाणार असल्याने, अवनत वनांचे वनीकरण होऊन वृक्षाच्छादन वाढण्यास भरीव मदत होणार आहे. असा विश्वास श्री.नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, माझे वन ही शासनाची नाविन्यपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून  प्रत्येक रेंजमध्ये सुरंगी आणि बहाडोली या जांभळाच्या  जातीची झाडे 100 एकर मध्ये  लावा. या योजनेमध्ये प्रत्येक कार्यरत वन कर्मचारी यांनी वन विभागाचे कार्यक्षेत्रातील वनांपैकी कोणतेही 1 एकर क्षेत्राची निवड करुन सन 2025 चे पावसाळयांत, स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांच्या पसंतीच्या  वृक्षांची लागवड करावयाची आहे. तसेच निश्चित केलेल्या क्षेत्रातील वृक्षांचे संपूर्ण संरक्षण व संगोपन करण्याचे आहे. या योजनेंतर्गत वनीकरण केल्यास एकूण कार्यरत पदांप्रमाणे साधारणतः 338 एकर क्षेत्रावर सन 2025 चे पावसाळयात वनीकरण होणार आहे. “माझे वन” योजनेमुळे वनीकरणावर वैयक्तिक दृष्ट्या लक्ष दिले जाणार असल्याने, अवनत वनांचे वनीकरण होऊन वृक्षाच्छादन वाढण्यास भरीव मदत होणार आहे. असा विश्वास श्री नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
वनमंत्री श्री नाईक पुढे म्हणाले,  पारंपरिक रस्ते आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अडथळे वन विभाग आणणार नाही आणि ते रस्ते डांबरीकरण केले जाईल.संयुक्त वन व्यवस्थापन ही योजना माझ्या कार्यकाळात सुरू झाली. त्यातून जंगले वाढली आहेत.   कर्जत तालुक्यात वन उद्यान उभारण्यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. वन जमीन 21 टक्के असून माझ्या काळात पाच टक्के जमीन वाढवली जाईल असे शब्द दिला असून वन खात्यात काही अडचण असेल तर थेट संपर्क साधावा अशा सूचना त्यांनी यावेळी केली.
मोरबे धरण मधील प्रकल्पग्रस्त यांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्नशील असून भविष्यात पोशीर  धरण होत असल्याने त्यांना देखील नवी मुंबईत नोकरी देणार आहोत असे आश्वासन  त्यांनी यावेळी दिले. कर्जत आणि नेरळ या वाढवणाऱ्या वस्तीसाठी पाण्याची स्वंतत्र व्यवस्था करावी अशी सूचना मंत्रिमंडळ बैठकीत केली असून शासनाने त्याची नोंद घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्यमार्ग 76 वरील काही ठिकाणी वन विभागाने रस्त्यांची कामे थांबली आहेत.कर्जत हे ग्रीन कर्जत हब व्हावे यासाठी कर्जत मध्ये सुंगंधी झाडे लावावीत अशी मागणी यावेळी केली.
वन विभागाच्या राज्याचे प्रधान वन बल प्रमुख शोमीता विश्वास यांनी वन संरक्षण समिती यांचा जंगल राखण्यासाठी मोठा सहभाग राहिला असून   ए आय तंत्रज्ञानाची मदत घेऊन  वन वणवे रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले तसेच माझे वन ही संकल्पना भविष्यात संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी वन विभाग धोरण निश्चित करेल असे सांगितले.
                                                                                                                                    अलिबाग वन विभागातील परिक्षेत्र माथेरानमधील “वाघीणीचीवाडी व कर्जत पुर्व वनक्षेत्रालगत असलेल्या मावळ तालुक्यातील मौजे-कळकराई,, ही गावे स्वांतत्र्यपूर्व काळापासुन रस्त्यापासुन वंचित होती. तसेच “कर्जत पश्चिममधील मोहीली-निकोप ते अवसरे, हा जोडरस्ता बऱ्याच कालावधी पासुन प्रलबित होता. त्यास अलिबाग वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. राहुल पाटील यांनी “वनहक्क कायदा 2006 अंतर्गत अनुसुचित जमाती तथा पांरपारिक वननिवासी यांची सोयीसुविधा 3(2) अंर्तगत वनजमिन मागणी प्रस्तावास मान्यता दिल्याने संबंधिताना मंजुरीची सनद मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
 वनसंरक्षण व वनसंर्वधनासाठी “उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्याना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्वच्छ समुद्र किनारे उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत नागांव तालुका-अलिबाग यांचे सोबत “Blue Flag Certification Initiative करीता वन विभाग अलिबाग मधील वनक्षेत्र अलिबाग व नागांव ग्राम पंचायत यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला. तसेच वन विभागामध्ये वन वणवे, वृक्षारोपण, अतिक्रमण निर्मुलन, वनांच्या हददीखुणा इत्यादीसाठी “Al Technology” [Artificial Intelligence] चा वापर करण्याकरीता वन विभाग अलिबाग मधील “वनक्षेत्र कर्जत पूर्व व Universal Al University यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे निश्चितपणे वन विभागास बळकटी येऊन वनांचे कार्य प्रभाविपणे राबविण्यास मदत होणार आहे.
उप वनसंरक्षक राहुल पाटील यांची संकल्पना असलेल्या माझे वन या योजनेचे लोकार्पण वनमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच  वनसंरक्षण आणि वनसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी अलिबाग वनविभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि माझे वन यासंकल्पनेबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वन परीक्षेत्र अधिकारी उमेश जंगम यांनी केले.

०००००००