यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रम २७ मे रोजी

मुंबई, दि. २६ : ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान  २०२३-२४  पुरस्कार  वितरण कार्यक्रमाचे आयोजन  दि. २७ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ राव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे करण्यात आले आहे.

पुरस्कार वितरण राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार  अरविंद सावंत( दक्षिण मुंबई), यांच्या सह मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रम २०२३-२४ मध्ये अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/