नागपूर, दि. 3 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूरच्या वतीने कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक १५ ते १७ जुलै दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कौशल्य विकास विभागाच्या https//www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. याबाबत दिनांक 13 व 14 जुलै 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5पर्यंत समुपदेशन करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात गवंडी, सुतारकाम, फिटर, बार बेडिंग व फिक्सींग करणारे वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन सीएनसी ऑपरेटर, मशिनिस्ट आणि अकुशल कामगार(श्रमिक) अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.
असा करावा अर्ज
यापूर्वी कौशल्य विकास व उद्योजकता विभागांच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी केली असेल त्यांनी वेबपोर्टलवरील Employment-Job seeker Login मध्ये आपला नोंदणी क्रमांक युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील माहिती अद्ययावत करावी. तसेच ज्या उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केली नाही त्यांनी Employment-Job seeker(Find a Job) Registration ID या ऑप्शन्सवर क्लिक करुन अद्ययावत माहिती भरुन लागॅइन करुन नोंदणी करावी.
नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवाराला प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेब पोर्टलवरील नोंदणी व पासवर्ड भरुन लॉगइन वर क्लिक करावे. आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करावे. वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या यादीतील नागपूर जिल्हा निवडून त्यातील Action view details या ऑप्शन्समध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी. व्हॅकन्सी लिस्टमध्ये पदांची माहिती पाहून अप्लाय ऑप्शन्सवर क्लिक करावे. अप्लाय ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक माहिती प्राप्त होईल. त्यानुसार रिक्त पदांसाठी ऑनलाईन मुलाखत घेण्यासाठी आपणाशी संपर्क साधला जाईल. पोर्टलवर नोंदणी करताना काही समस्या येत असल्यास 0712-2531213 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राची सहाय्यक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी केले आहे.