दि. २८ जून ते ४ जुलै २०२० पर्यंतच्या कालावधीतील महत्त्वाचे शासकीय निर्णय आणि घडामोडींचा संक्षिप्त आढावा
कोरोना युद्ध
28 जून 2020
- कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान, ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू, २३३० रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी परतलेल्या व्यक्ती – ८६ हजार ५७५, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के, आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत फेसबूक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद.
ठळक मुद्दे- आर्थिकचक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन सुरु केले असले तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही त्यामुळे, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा, औषधोपचार आणि सुविधा देण्यात महाराष्ट्र मागे नाही, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील, केसेस पुन्हा वाढताना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. ग्रामीण भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल, अशा व्यक्तिंवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई केली जाईल. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, आपल्यातील एकसंघपणा कायम ठेवताना आतापर्यंत शासनाला ज्याप्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढे कायम ठेवण्याची अपेक्षा. वारीचा सोहळा यावेळी नाईलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असताना वारकऱ्यांचा, विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाऊन त्याच्या चरणी कोरोनामुक्त राज्याचे साकडे घालणार. कोणतीही चर्चा न करता स्वतःहून सामाजिक भान राखत दहीहंडीचा उत्सव रद्द करणाऱ्या मंडळांचे आभार, २०/ २२ फुट ऊंचीच्या मूर्ती स्थापित करण्याची सध्याची परिस्थिती नाही, त्यासाठी जास्त माणसे लागू शकतात, त्यामुळे ४ फुट ऊंचीपर्यंतची मूर्ती यावर्षी स्थापित करण्याची सूचना, गणेश आगमन आणि विसर्जनाची मिरणवूक काढता येणार नाही. परंपरा कशी जपता येईल यादृष्टीने लवकरच निर्णय घेणार. कोरोना रुग्णावरील उपचारांसाठी सुचवण्यात येणारी सर्व औषधे उपलब्ध करून घेत आहोत, प्लाझमा थेरपी उपचार मार्च-एप्रिलपासून सुरु, १० पैकी ९ रुग्ण यामुळे बरे, प्लाझमा थेरपी करणारे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत आहे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडिज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे, रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधांचा कुठेही तुटवडा पडू देणार नाही, शासकीय/निमशासकीय रुग्णालयात ही औषधे मोफत उपलब्ध करून देणार. ज्येष्ठ डॉक्टरांनी पुढे येऊन रुग्णसेवा करावी, आवश्यक सर्व सुरक्षा साधने त्यांना पुरवण्यात येतील. चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईप्रमाणे राज्यात सुरु, औषाधोपचार आणि टेस्टच्या संख्येत वाढ, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने ती आणखी ३ महिन्यांसाठी वाढवून देण्याची प्रधानमंत्र्यांना विनंती, विविध कंपन्यासोबत १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार, भूमीपुत्रांना रोजगाराची मोठ्याप्रमाणात उपलब्धता, गुंतवणूकदारांना विविध सोयी, सुविधा देण्यावर भर. शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षण सुरु होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्त्व.
- कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. सोसायटीच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेले महाकवच ॲप, सेल्फ असेसमेंट टूल, टेलिमेडिसिन हेल्पलाइन यांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावार लाभ घेतला असल्याची कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती. कोरोना लक्षणांची स्व-चाचणी (सेल्फ असेसमेंट) करण्यासाठी संकेतस्थळ- https://covid-१९.maharashtra.gov.in अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सहकार्याने या संकेतस्थळाची निर्मिती. टेलिमेडिसिन हेल्पलाइन – ९५१३६१५५५०
- रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, त्यांचे क्वारंटाइन व्यवस्थापन करणारे महाकवच डिजिटल प्लॅटफॉर्म – या ॲपमुळे कोरोनाबाधित व्यक्तीचा मागील 21 दिवसांचा मागोवा (लोकेशन हिस्ट्री), अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेले हाय व लो रिस्क कॉन्टॅक्ट्सचे संपर्क क्रमांक, अशा व्यक्तीने भेट दिलेली सार्वजनिक ठिकाणे, हॉटस्पॉट्सची माहिती कळणे शक्य. प्रशासनाला ही माहिती एकाच ठिकाणी रिअल-टाइम डॅशबोर्डवर दिसण्याची सुविधा. या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ॲथॉरिटी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन काउंसिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशन), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन, टेक एक्स्पर्ट यांचा सहभाग.
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 37 हजार गुन्हे, 27,914 व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी 9 कोटी 36 लाख 19 हजार 861 रुपयांचा दंड.
- सायबर संदर्भात 507 गुन्हे दाखल, 262 व्यक्तींना अटक
29 जून 2020
- मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते https://milkar.ketto.org/covid१९ या क्राऊड फंडिंग प्रणालीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन. बृहन्मुंबई महानगरपालिका, कॉर्पोरेट हाऊसेस आणि स्वंयसेवी संस्थांमार्फत या व्यासपीठाचा विकास.
ठळक मुद्दे – देव मदत करणाऱ्या सर्व हातांमध्ये आहे, सगळे मिळून जेव्हा काम करतात तेव्हा यश मिळेतच, त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने कोविड विषाणु विरुद्धचे हे युद्ध जिंकू. मुंबईकरांनी “मिलकर” व्यासपीठाच्या माध्यमातून काम आणि दान करावे. जगातील सर्वात मोठे केंद्र म्हणून प्लाटिना प्लाझ्मा केंद्राची महाराष्ट्रात सुरुवात. प्लाझ्मा बँक म्हणून हे केंद्र काम करणार, मार्च महिन्यापासून कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाला त्या दिवसापासून शासनामार्फत अनेक उपाययोजना, सर्वांच्या सहकार्यातूनच प्रभावीरीत्या काम.
- वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारण्याचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे वीज कंपन्यांना निर्देश.
- सायबर संदर्भात ५१० गुन्हे दाखल, २६५ व्यक्तींना अटक.
- मोफत संकेतस्थळावर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळण्याचे, नागरिकांना सायबर विभागामार्फत आवाहन.
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून २२ मार्च ते २८ जून या कालावधीत १,३७,५८३ गुन्ह्यांची नोंद, २८,००८ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाख ३० हजार ३६१ रुपयांचा दंड.
- कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अगेन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीसह 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयाची अधिसूचना निर्गमित. या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील.
- कोवीड विषाणू नियंत्राणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना- सार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे तसेच प्रवास करताना चेहरा झाकून घेणारी साधणे/ मास्क वापरणे बंधनकारक. प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखणे आवश्यक. दुकांनामध्ये ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घेणे आवश्यक. एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात प्रवेश नाही. मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना प्रतिबंध. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 50 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र, त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील. मद्य, पान, तंबाखू इ. चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास प्रतिबंध.
- कार्यालये, कामाची जागा, दुकाने, बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.
- तपासणी व स्वच्छता- कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे) , हात धुणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था आवश्यक, संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व बाबींची वारंवार स्वच्छता आवश्यक. कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी/कामगार प्रत्येक शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेउुन काम करतील याची दक्षता आवश्यक. कर्मचाऱ्यांनी दुपारचे जेवण एकत्र घेऊ नये व सुरक्षित अंतर पाळावे याबाबींची कार्यालय प्रमुखाने काळजी घेणे आवश्यक.
- मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, आधी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधिन राहून संमती.(१) या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. (२) अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना ३१ मे आणि ४ जून रोजीच्या आदेशांमधील शिथीलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधित महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती. (३) मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने, दुकानांचा परिसर ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली. मद्याची दुकाने संमती देण्यात आली असल्यास सुरु किंवा होम डिलीव्हरी. (४) अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या ऑनलाइन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवहार सुरु. (५) सध्या सुरु असलेले उद्योग सुरु. (६) संमती देण्यात आलेली सार्वजनिक तसेच खासगी मान्सुनपूर्व कामे / बांधकामे सुरु. (७) होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु. (८) ऑनलाइन शिक्षण आणि त्याच्याशी संबंधित कामे सुरु. (९) सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांच्याशिवाय) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु. (१०) सर्व खासगी कार्यालये १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. (११) फक्त अत्यावश्यक सेवेसाठी- टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना १ अधिक २ प्रवासी, रिक्षा- १ अधिक २ प्रवासी, चारचाकी – १ अधिक २ प्रवासी, दुचाकी-१ प्रवासी क्षमतेनुसार चालवण्याची परवानगी.(१२) स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटकनियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ.
(१३) पूर्वपरवानगी घेऊन वाहनांची दुरुस्ती करणारी गॅरेज(१४) मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी. नागररिकांनी खरेदीसाठी फक्त नजिकच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित . अनावश्यक वस्तूंसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी नाही. (१५) 23 जून 2020 च्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी.(१६)काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी,(१७)वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी), (१८)शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालये/ शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामांसाठी ज्यामध्ये ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामांची परवानगी. शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर,
- उर्वरित राज्यभरात पुढील बाबींना अटी – शर्तींवर परवानगी – (१) शासकीय आणि खासगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी – दुचाकी – फक्त चालक तीन चाकी वाहन – चालक आणि २ प्रवासी चार चाकी वाहन – चालक आणि २ प्रवासी.
- (२) आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवानगी. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील. (३) जिल्ह्याअंतर्गत प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील. (४) अत्यावश्यक नसलेली दुकाने, सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. (५) खुल्या जागा,लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळयासाठी निमंत्रितांना बोलवण्यासाठी देण्यात आलेली परवानगी २३ जून २०२० च्या निर्णयानुसार. (६) निर्बंधासह खुल्या जागेतील व्यायाम व इतर शारीरिक हालचाली. (७) छपाई आणि वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी. (८) विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा यांची कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे अशैक्षणिक कामांसाठी असणारे कर्मचारी यांना ई-कंटेटची निर्मिती, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, परीक्षेच्या निकालांची घोषणा करण्यासाठी उपस्थित राहण्यास परवानगी. (९) केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना काही अटींवर परवानगी.
- 1 ते 29 जून पर्यंत राज्यातील 1 कोटी 46 लाख 29 हजार 920 शिधापत्रिका धारकांना 65 लाख 73 हजार 120 क्विंटल अन्नधान्याचे आणि 29 लाख 91 हजार 755 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती.
- लॉकडाउन काळात खाद्यगृह/ बार यांना व्यवसायाची संधी न मिळाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी अबकारी अनुज्ञप्तीना मुदतवाढ देण्याचा निर्णय, ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ५० %, तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत उर्वरित ५० % रक्कम भरण्याची मुभा.
- कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ७३ हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू, २३८५ रुग्णांची घरी रवानगी, आतापावेतो बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- ८८ हजार ९६०. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.३७ टक्के, आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधीतांवर मोफत उपचार देण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती. या माध्यमातून कोरोना काळात कर्करोग, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या १ लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर मोफत उपचार. या योजनेत सहभागी रुग्णालयांमध्ये २५ जूनपर्यंत १ लाख ९८५ कोरोनाबाधींतावर उपचार. खासगी रुग्णालयात १८ हजार २२८ तसेच केंद्र शासनाच्या, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या आरोग्य केंद्रात २७७८ असे एकूण १ लाख २१ हजार ९९१ रुग्णांवर उपचार. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन २३ मे रोजी या योजनेच्या व्याप्तित वाढ. सर्वांचाच योजनेत समावेश पांढरी शिधापत्रिका असलेल्या लोकांना या योजनेंतर्गंत ३१ जुलैपर्यंत लाभ. योजनेचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय, सहभागी रुग्णालयांची संख्या ४५० वरून १००० करण्याचा निर्णय. योजनेत नवीन आजारांचा समावेश. महापालिका व शासनाच्या रुग्णालयात गुडघे बदल शस्त्रक्रियेसह १२० प्रकारच्या आजारांवर उपचारांचा समावेश. अधिक माहितीसाठी संपर्क -१५५३८८
- मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत पावसाळा, कोरोना तसेच मुंबई संदर्भातील इतर नागरी समस्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा.
ठळक मुद्दे- कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत, हे अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची आटोक्यात येत असलेली साथ वाढू शकते. पोलिसांमार्फत टाकलेले 2 किमी अंतराचे निर्बंध हे मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखण्यासाठी, नागरिक म्हणून जबाबदारीने वागणे गरजेचे. निर्देश- समन्वयाने या पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांचे हाल होणार नाहीत यासाठी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी समन्वय ठेवावा. नाले स्वच्छता, साफसफाई करताना लोकप्रतिनिधी तसेच इतर सर्वांच्या संपर्कात राहून तातडीने कामे पूर्ण करा. मेट्रो व इतर पायाभूत सुविधा कामे ज्या ठिकाणी कामगारांअभावी खोळंबली आहेत तिथे तातडीने स्थानिक व्यक्तींना रोजगार देऊन सुरु करा, अर्धवट बांधकामे झाली आहेत तिथला कचरा, साहित्यांचे ढीग तातडीने बाजूला करा.
- देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणून ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे वीज कंपन्यांना निर्देश.
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ३७ हजार गुन्हे दाखल,२८,००८ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाख ३० हजार ३६१ रुपयांचा दंड.
- वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर २५ हजार ६२० प्रवाशांचे आगमन, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ९३९१, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी ८५७६, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७६५३.
- सायबर संदर्भात ५१० गुन्हे दाखल, २६५ व्यक्तींना अटक.
- जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि ईर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन. प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. ठळक मुद्दे- जगातली सर्वात मोठी सुविधा राज्यात सुरु करतो आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब, एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग करु केंद्राकडे परवानगी मागितली. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी रुग्णाला देणार, ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावार विचार व्हावा, प्लाझ्मा बँक तयार करा, शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून द्या. कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे. 23 वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध, जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार. मात्र सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जाणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.
30 जून 2020
- कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू, १९५१ रुग्णांना घरी रवानगी, बरे होऊन घरी परतलेल्या व्यक्ती- ९० हजार ९११. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२ टक्के,आज २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के.
- “शिवभोजन” योजनेंतर्गत 26 जानेवारी 2020 पासून 848 केंद्रांद्वारे 1 कोटी 870 थाळ्यांचे वितरण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत कार्यरत.
महिनानिहाय थाळ्यांचे वितरण- जानेवारी- 79 हजार 918, 4 लाख 67 हजार 869, मार्च- 5 लाख 78 हजार 31, एप्रिल -24 लाख 99 हजार 257, मे -33 लाख 84 हजार 40 ,जून – 29 जून पर्यंत 29 लाख 91 हजार 755.
- तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलात दोन टक्के सवलत आणि मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन सामान हप्ते करून देण्यात येणार असल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा. ग्राहकांच्या बिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील मुख्यअभियंता, अधिक्षक अभियंता यांना पुढील सूचना – क्षेत्रीय कार्यालयात ग्राहक मदत कक्षाची स्थापना, ग्राहकांशी वेबिनार आणि फेसबूक लाइव संवाद, स्थानिक वृत्तवाहिनी व एफ एम रेडीओ चॅनलद्वारे माहितीचे, स्थानिक वृत्तवाहिनीवरून माहितीचे प्रसारण, आठवडा बाजार व रहिवाशी सोसायटीमध्ये मेळावे, मीटर रिडर व बिल वाटप करणारे कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन ग्राहकांसोबत संवाद, एसएमएस पोस्टर्सद्वारे वीज आकारणीबद्दल सुलभ माहितीचे प्रसारण. संपर्क- energyminister@mahadiscom.in व मोबईल क्र. 9833567777 व 9833717777
- जून 2020 घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची पद्धत -घरगुती ग्राहकांसाठी 3 हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत, महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना गरज किमान वीजबिलाच्या 1/3 रक्कम भरता येईल, संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास 2 टक्क्यांची वीजबिलामध्ये सूट देण्यात येईल, ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेची वीजबिल भरलर असल्यास, त्यांना दे वीजबिलामध्ये सूट देण्यात येईल.
- प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या नोव्हेंबरपर्यंतच्या मुदत वाढीच्या घोषणेचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत स्वागत, श्री ठाकरे यांच्यामार्फत काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती.
- केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी देण्यात यावी, अशी राज्यशासनामार्फत रेल्वेला विनंती. केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये आयकर विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्ट, कस्टम (जकात) आणि संरक्षण (डिफेन्स) यांचा समावेश.
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात 22 मार्च ते 29 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1,38,322 गुन्ह्यांची नोंद, असून 29,298 व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी 9 कोटी 52 लाख 52 हजार 661 रुपयांचा दंड.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाचा पुढाकार, प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने ऑनलाइन मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती. या मोहीमेंतर्गत आतापर्यंत एकूण 14 मेळावे आयोजित. 115 उद्योगांमार्फत 12 हजार 322 रिक्तपदे अधिसूचित. 25 हजार 47 उमेदवारांचा सहभाग. 1 हजार 211 उमेदवारांची निवड. कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावी वापर, पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथे प्रत्येकी 1 रोजगार मेळावा,नाशिक आणि यवतमाळ येथे प्रत्येकी 2 तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर येथे 4 रोजगार मेळावे आयोजित.
- सायबर संदर्भात 512 गुन्हे दाखल, 273 व्यक्तींना अटक.
१ जुलै २०२०
- कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ७९ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू, आज २२४३ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ९३ हजार १५४. आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. मृत्यूदर ४.४७ टक्के.
- कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय. ही वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरणे शक्य. रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी (महापालिका क्षेत्र वगळता) आणि महापालिका आयुक्त (महापालिका क्षेत्रात) राबवणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’ सुरु असताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामांना मोठ्या प्रमाणावर चालना, मागेल त्याला काम या तत्त्वानुसार 57 हजार 550 कामे पूर्ण, यावर 285 कोटी 36 लक्ष रुपये मजुरीवर, 84 कोटी 14 लक्ष रुपये साहित्यावर खर्च, त्यामुळे श्रमिकांना गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध, 19 प्रकारच्या कामांसाठी 5 लाख 87 हजार 360 कामे तयार, या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामे, त्यासोबतच कृषी फलोत्पादन, जलसंधारण, प्रधानमंत्री आवास योजना, जलसिंचन विहिरी आदी कामांचा समावेश ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यापासून 29 जूनपर्यंत रोहयोच्या कामावर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध. 22 लाख 26 हजार 878 एकल जॉब कार्डधारकांची संख्या असून यात 8 लाख महिला तर 14 लाख 25 हजार पुरुषांचा समावेश जॉबकार्ड असलेल्या मजुरांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून 26 हजार 984 घरकुलाचे काम पूर्ण, यासाठी 47 कोटी 3 लक्ष रुपये लाभार्थ्यांना निधी वितरित.
तपशील – अमरावती विभाग– 6 हजार 826 घरकुलांसाठी 11 कोटी 88 लक्ष 53 हजार 386 रुपयांचा निधी, नागपूर विभाग– 4 हजार 267 घरांचे बांधकाम पूर्ण. 7 कोटी 89 लाख 43 हजार खर्च. चंद्रपूर जिल्हा- 1 हजार 66, नागपूर 605, भंडारा 537, गोंदिया 241, वर्धा 338, गडचिरोली जिल्ह्यात 445 घरकुल पूर्ण. अमरावती 1 हजार 641, अकोला 260, बुलडाणा 1 हजार 114, वाशिम 227 तर यवतमाळ जिल्ह्यात 1 हजार 991 कामे पूर्ण. 3 हजार 493 जलसिंचन विहिरींची कामे पूर्ण, मजुरीसाठी 47 कोटी 86 लक्ष 22 हजार 434 रुपये तर साहित्यासाठी 34 कोटी 24 लक्ष 42 हजार रुपयांचा निधी खर्च. नागपूर विभाग- 169 विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीपोटी 1 कोटी 36 लक्ष रुपये,साहित्यासाठी 1 कोटी 79 लाख खर्च. अमरावती विभागात 1 हजार 22 विहिरी पूर्ण, मजुरीसाठी 11 कोटी 67 लक्ष रुपये तर साहित्यासाठी 8 कोटी 68 लक्ष रुपयांचा निधी खर्च.
- सायबर संदर्भात ५१४ गुन्हे दाखल, २७३ व्यक्तींना अटक. आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९७ गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २१४ गुन्हे, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल, ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ११ गुन्हे दाखल, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल, अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूट) गैरवापर केल्या प्रकरणी ६० गुन्हे दाखल. १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश.
- कोकण उद्योग फोरमच्यावतीने ग्रामीण उद्योगांतील संधी, या विषयावरील वेबिनार उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. ठळक मुद्दे- लॉकडाऊननंतर सध्या 70 हजार उद्योग सुरु, 16 लाख कामगार रुजू. राज्य शासनाने काही परदेशी कंपन्यांसोबत 24 हजार कोटींचे सामजंस्य करार. यातील काही उद्योग कोकणात सुरू होणार असल्याने येथील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी खुल्या होणार. त्याचा कोकणातील उद्योजकांनी लाभ, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव. सेवा उद्योगासाठी दहा लाख तर मोठ्या भांडवलासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज. या दोन्ही योजनांमध्ये उद्योजकांचा हिस्सा केवळ 10 टक्के असेल. समूह विकास योजना राबविली, यासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध. उद्योजकांनी एकत्र येऊन काम केल्यास फायदा. अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना. अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग केल्यास त्यासाठी प्रशिक्षण. नव्या उद्योजकांसाठी एमआय़डीसी तयार गाळ्यांची उपलब्धता.
- प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषध ग्रामीण भागातील 5 कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची घोषणा. औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींकडे सुपूर्द.
- मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी दि. 8 जुलै ते 12 जुलै, 2020 दरम्यान ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन, मेळाव्यासाठी जवळपास 16 हजार 726 रोजगारांच्या संधी उपलब्ध,संपर्क- दूरध्वनी क्र. 22626303 आणि 22626440 किंवा ई-मेल-mumbaicity.employment@gmail.com किंवा ई-मेल-mumbaisuburbanrojgar@gmail.com
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संदर्भात 22 मार्च ते 30 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1 लाख 39 हजार 702 गुन्ह्यांची नोंद, 29,298 व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी 9 कोटी 52 लाख 52 हजार 661 रुपयांचा दंड, अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 36 हजार 324 पासेसचे पोलिसांमार्फत वितरण, पोलिसांवर हल्ला होण्याच्या 290 घटना, त्यात 860 व्यक्तींना ताब्यात, हेल्पलाइन क्रमांक 100 वर 1,05,269 दूरध्वनी, क्वारंटाइन असा शिक्का असलेल्या 756 व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी, अवैध वाहतूक करणाऱ्या 1 हजार 335 वाहनांवर गुन्हे दाखल. 85 हजार 780 वाहने जप्त. पोलिसांना कोरोना संदर्भातील लक्षणे दिसून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना.
- कोरोना संकटकाळात बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन आणि ‘जीईएम’ (GeM) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध, त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरीत्या घरपोच मिळणार असल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. सध्या अॅमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंदणी, यामध्ये विविध प्रकारचे पापड (८ प्रकार), पेपर बॅग (४ प्रकार), टेराकोटा ज्वेलरी (४ प्रकार), सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले (४ प्रकार), रेशमी ज्वेलरी (६ प्रकार), शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क (८ प्रकार) यांचा समावेश.ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानांतर्गत ४.६२ लक्ष स्वयंसहाय्यता समूह स्थापन. त्यामध्ये ४६.७० लक्ष ग्रामीण कुटुंबांचा समावेश. १९ हजार ६०६ ग्रामसंघ, ७९५ प्रभाग संघ, ८ हजार ४०५ उत्पादक गट तर १५ उत्पादक कंपनी स्थापन. मे २०२० पासून एकूण रुपये २ लाख ७ हजार ४५० इतक्या रकमेची विक्री.
- बेरोजगार तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगारविषयक मार्गदर्शनासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची कौशल्य विकास मंत्री
श्री. नवाब मलिक यांची माहिती. ऑनलाइन कौन्सिलिंग सत्रांमध्ये एरोस्पेस व एव्हीएशन, कृषी, अपॅरेलमेड – अप आणि होम फर्निशिंग सेक्टर, ऑटोमोटिव्ह, ब्युटी अँड वेलनेस, बीएफएसआय सेक्टर, कॅपिटल गुड्स, बांधकाम, डोमॅस्टीक वर्कर (घरेलू कामगार), इलेक्ट्रॉनिक, खाद्य उद्योग, फर्निचर आणि फिटिंग्ज, जेम्स व ज्वेलरी, हँडिक्राफ्ट्स आणि कार्पेट सेक्टर, हेल्थ केअर सेक्टर, हाइड्रोकार्बन सेक्टर, भारतीय लोह आणि स्टील क्षेत्र, इंडियन प्लंबिंग, इन्फ्रास्ट्रक्चर उपकरण, मार्ग स्वयंचलन पाळत ठेवणे आणि संप्रेषण क्षेत्र, इन्स्ट्रुमेंटेशन ऑटोमेशन सर्विलन्स ॲण्ड कमुनिकेशन, आयटी –आयटीइएस, लेदर, जीवन विज्ञान, लॉजिस्टिक व्यवस्थापन व उद्योजकता व व्यावसायिक, मीडिया आणि करमणूक, पेन्ट्स आणि कोटिंग्ज, पॉवर, रिटेलर्स, रबर, ग्रीन जॉब्स, खाण, अपंग व्यक्ती, स्पोर्टस्, शारीरिक शिक्षण, स्वास्थ्य आणि विश्रांती, स्ट्रॅटेजिक मॅन्युफॅक्चरिंग, दूरसंचार, सूक्ष्म, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्र आदींबाबत मार्गदर्शन. संपर्क संकेतस्थळ – www.mahaswayam.gov.in
२ जुलै २०२०
- कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने तत्काळ दहा हजार कोटी रुपयांची मदत देण्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची केंद्रीय ऊर्जामंत्र्याकडे मागणी.
- कोविड -19 विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्कफोर्स नेमण्यात येणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
- मुंबई आणि ठाणे मध्ये जून महिन्यात सव्वातीन लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप, 7 लाख 2 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू, जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची, सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांची माहिती.
- वंदे भारत अभियांतार्गत आतापर्यंत 182 विमानांनी 28 हजार 435 नागरिक मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 10 हजार 347, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 9752, इतर राज्यातील प्रवशांची संख्या 8336.
- कोरोनाच्या ६३३० नवीन रुग्णांचे निदान, सध्या ७७ हजार २६० उपचार सुरू, आज ८०१८ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १७२, कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत, दर दशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण ७७१५, हे प्रमाण देशपातळीवर ६३३४. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७३ प्रयोगशाळा चाचण्या, त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख २० हजार ३६८ नमुन्यांपैकी १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.२९ टक्के). आज १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- लॉकडाऊनमुळे निर्माण होत असलेल्या बेरोजगारीवर मात करुन तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलचा, नोकरीइच्छूक तरुणांबरोबरच कुशल उमेदवारांची गरज असलेल्या उद्योगांकडून वापर. लॉकडाऊन काळात वेबपोर्टलला १ हजार ५२१ उद्योजकांची भेट, ३८९ नवीन उद्योजकांनी ऑनलाइन नोंदणी. १ हजार ३०७ रिक्तपदांची भरतीप्रक्रिया वेबपोर्टलच्या आधारे सुरु. लॉकडाऊनच्या काळात वेबपोर्टलला ६.३४ लाख बेरोजगार तरुणांची भेट. यापैकी ३ लाख हजार उमेदवारांची नव्याने भेट. नोकरीइच्छूक ३१ हजार १५८ उमेदवारांची नवीन नावनोंदणी.
- लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थिती असल्यामुळे गरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने ५ रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती. शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिल पासून तालुकास्तरावर विस्तार, प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ, शिवभोजनच्या वेळेत वाढ, सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजनाची उपलब्धता, शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये, ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासनाचे अनुदान, यासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद.
- मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याची योजना आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार असल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख नागरिकांना या योजनेचा फायदा.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाइन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. संपर्क संकेतस्थळ- www.barti.in
3 जुलै 2020
- कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ७९ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरू. ३५१५ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – १ लाख ४ हजार ६८७. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के, आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 2020-21 साठी 7 हजार कोटी रुपये अर्थसंकल्पित केलेल्या निधीतील शिल्लक राहिलेला 2 हजार 334 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात येणार असल्याची सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांची माहिती.
- कोवीड विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबातील स्तनदा माता व अंगणवाडीतील बालकांना अमृत आहार योजनेतील अन्न हे शिजवून न देता ग्रामपंचायत स्तरावरील आहार समितीमार्फत कच्च्या धान्याच्या स्वरुपात उपलब्ध.
- परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस उपायुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी देण्यात असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.
- विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास 10 जुलै पर्यंत मुदतवाढ.
- पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही, दिशाभूल केल्यास कारवाई करण्याची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची घोषणा.
- सायबर संदर्भात ५१६ गुन्हे दाखल, २७३ व्यक्तींना अटक
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दि.२२ मार्च ते २ जूलै या कालावधीत १,४१,२५८ गुन्ह्यांची नोंद, २९,५५९ व्यक्तींना अटक,विविध गुन्ह्यांसाठी १२ कोटी २५ लाख ११ रुपयांचा दंड.
- जुलै महिन्यात आतापर्यंत 1 लाख 97 हजार 223 शिवभोजन थाळ्यांचे वाटप तर 7 हजार 830 क्विंटल अन्नधान्याचे वाट करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
- कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) व भारत बायोटेत इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेशटोपे यांचे प्रतिपादन.
४ जुलै २०२०
- उमेद अभियानामार्फत कृषी संजिवनी सप्ताहानिमित्त आयोजित ऑनलाइन प्रशिक्षणात सुमारे दीड लाख महिला शेतकऱ्यांचा सहभाग, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रीय शेती, गट शेती, शेळी पालन, मत्स्य व्यवसाय यांसारखे शेतीपुरक व्यवसाय, शेतीउत्पादने तसेच बचतगटांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री अशा विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षणामध्ये माहिती
- कोरोना रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी मुंबई वगळता अन्यत्र सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव.इतर सदस्य- महापालिका आयुक्त, शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी किंवा हृदयविकार तज्ञ किंवा त्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले जागतिक आरोग्य संघटनेचे क्षयरोग सल्लागार, नंदूरबार, उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली या महत्वाकांक्षी चार जिल्ह्यातील युनिसेफचे सदस्य, शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यातील सामान्य औषधी विभागाचे प्रमुख, इंडियन मेडीकल असोशिएशनचे जिल्हा अध्यक्ष. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त समितीचे अध्यक्ष, मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी सदस्य सचिव. इतर सदस्य- वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, सायन हॉस्पीटलचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, एच.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व सामान्य औषधी विभागप्रमुख व जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी.
- रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा देण्याची महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.
- 1 ते 3 जुलै पर्यंत 855 शिवभोजन केंद्रातून 2 लाख 95 हजार 616 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती, गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 40,जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 2 लाख 95 हजार 616, 1 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत 92 लाख 75 हजार 145 शिवभोजन थाळ्या वाटप
- 1 ते 3 जुलै पर्यंत राज्यातील 5 लाख 35 हजार 239 शिधापत्रिका धारकांना 29 हजार 860 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी दिली.
- कोरोना महामारीच्या आताच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने अनेक युक्त्याचा वापर सुरू केला असल्याने त्यापासून सावधानता बाळगण्याचे महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन.
- सायबर संदर्भात ५१८ गुन्हे दाखल ,२७३ व्यक्तींना अटक,
- लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ३ जुलै या कालावधीत कलम १८८ नुसार १,४५,८९६ गुन्हे नोंद झाले असून २९,६०७ व्यक्तींना अटक अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ५२ हजार ३८ पासेसचे पोलीस विभागामार्फत वितरण,अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल, ८८,३०६ वाहने जप्त करण्यात आली.
- वंदेभारत अभियानांतर्गत १९३ विमानांनी २९ हजार ८५० नागरिक मुंबईत दाखल. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ८४५ , उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १०२४६, इतर राज्यातील ८७५९ प्रवासी ही आतापर्यंत मुंबईत दाखल.
- कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांचे निदान, सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू, ३३९५ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ८ हजार ८२, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के, आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. मृत्यूदर ४.३३ टक्के.
- मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची बैठक.
ठळक मुद्दे- पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाइनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकिंग आणि टेस्टींग मोठ्या प्रमाणात करा, मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करा, कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड दिले जाते, त्याबाबत सर्व कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना द्या, मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बांधकामे होऊन इमारती ओस पडलेल्या आहेत अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे होऊ नये याकरिता फवारणीचे काम हाती घ्या. भूमिगत कामांच्या ठिकाणी पाणीसाठा होऊन डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ शकतात ते वेळीच नष्ट करा, रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम होईल अशी व्यवस्था निर्माण करा, गणेशोत्सव काळात आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मादानासारखे उपक्रम हाती घेण्यासाठी नियोजन करा.
इतर घडामोडी आणि निर्णय
२८ जून 2020
- उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाइन व्यासपीठाचे कार्य करणाऱ्या अकादमी स्थान फाऊंडेशन संस्थेने आयोजित ऑनलाइन अध्यापनाकरिता नवयुगातील साधने ‘ या विषयावरील चर्चासत्राचे (वेबिनार) राजभवन येथून राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदघाटन. सध्याच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य असल्याचे श्री कोश्यारी यांचे प्रतिपादन.
29 जून 2020
- पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त, गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याची आणि गावांच्या विकासासाठी थेट ८० टक्के निधी खर्च करण्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
- पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त,गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
30 जून 2020
- राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या श्री. संजय कुमार यांच्याद्वारे सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री. अजय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकार.
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याव्दारे, वारकरी आणि जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याव्दारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन आणि जनतेला कृषीदिनाच्या शुभेच्छा.
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत डॉक्टर बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा.
- 4 जुलै 2020 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असल्याची, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती.
- कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यामार्फत कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी कृषी सप्ताहाची त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुरुवात करणार. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करीत 7 जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार.
- बंधपत्रित आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांचे निर्देश.
- जुलै २०२०
- कृषी दिनाचे औचित्य साधून खांडगाव (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाचा महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते ऑनलाइन शुभारंभ.
- पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरातून आणि वनमंत्री श्री संजय राठोड यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील मौजे शीळ पनवेल रोड भंडार्ली येथून राज्यस्तरीय हरीत महाराष्ट्र अभियानाचा प्रारंभ. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा. महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि बळीराजाला सूख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे
श्री. ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
- मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन,कृषी दिन आणि कृषी संजीवनी सप्ताहासाठी शुभेच्छा
- मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत डॉक्टरांच्या सेवा, समर्पणाला सलाम,राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पत्राद्वारे शुभेच्छा
- हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि वनमंत्री श्री संजय राठोड यांच्यामार्फत मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन.
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन त्यांच्या प्रतिमेस विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यामार्फत पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
- नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनचा प्रयत्न.
२ जुलै २०२०
- मोठ्या ग्रामपंचायतींना मलनिस्सारण प्रकल्प किंवा घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे यासारख्या प्रकल्पांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध होणार आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
- गोंदिया जिल्ह्यात मुदत संपलेले सिमेंट विक्री केले जात असून त्यामुळे इमारतींच्या बांधकामाचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे, यासंदर्भात संघटीत टोळी कार्यरत असण्याची शक्यता लक्षता घेऊन विशेष चौकशी पथक नेमण्याचे विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांचे आदेश.
- नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवन येथे सदिच्छा भेट.
- नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते लिलाधर कांबळी यांच्या निधनाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कलाकार कायमस्वरूपी गमावला असल्याची शोक भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याव्दारे व्यक्त.
- सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील 64 एकर जागा देण्यात यावी, त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करावी असा, विधान परिषद सभापतींच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत निर्णय, वैद्यकीय महाविद्यालय ही सातारावासियांची गरज असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, पुढील शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरु करण्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे निर्देश.
3 जुलै 2020
- प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक 2020 यावर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आयोजित विविध राज्यांचे मुख्यमंत्री-ऊर्जामंत्री यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उर्जा मंत्री डॉ नितिन राऊत यांचा सहभाग, प्रस्तावित वीज विधेयक घटनाविरोधी असल्याने सर्व राज्यांना विश्वासात घेऊनच वीज विधेयकात सुधारणा करण्याची डॉ राऊत यांची मागणी.
- नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडचा नृत्यगुरू कायमचा हरपला असल्याची शोक भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यामार्फत व्यक्त.
- राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर.