रायगड जिमाका दि.२१ : खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा सावर,राजीप उर्दु आणि पीएमश्री प्राथमिक मराठी शाळा म्हसळा नंबर १ ह्या तीन शाळांचे आर सी एफ कंपनीच्या सीएसआर फंडातून अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करून डिजिटल करण्यात आलेल्या शाळांचे लोकार्पण राज्याच्या महीला व बालकल्याण मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजय कर्णिक उपनगराध्यक्ष संजय दिवेकर,जेष्ठ नेते अंकुश खडस,मुस्लिम समाज अध्यक्ष नाजीम चोगले,उपविभागीय अधिकारी महेश पाटील,मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,गट शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण,
पोलीस निरीक्षक संदिप कहाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कु.तटकरे म्हणाल्या की, पुढची भावी पिढी भक्कम करण्याचे सामाजिक काम करताना आध्यात्म,परंपरा आणि संस्कृती बरोबर दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्याने उभारण्यात आलेल्या डिजिटल शाळेच्या वैभवात भर टाकताना शाळा बांधकाम,आकर्षक रंगरंगोटी,स्वच्छतागृह,वीज,पाणी , पंखे,संगणक,प्रिंटर,
डिजिटल बोर्ड,बेंच,टेबल,सीसीटीव्हि कॅमेरे आणि इतर साहित्यांचा समावेश आहे.खाजगी शाळांमध्ये ज्या पद्धतीने सुविधा असतात त्याचे बरोबरीने प्राथमिक शाळांचा दर्जा आज पहायला मिळत आहे.शाळा लोकार्पण करताना आजी माजी विद्यार्थी आणि पालक यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला समाधान होत असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून सीएसआर फंडातून क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात विकास करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.या पुढेही म्हसळा येथील आदिवासीवाडी आणि अन्य दोन शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.अद्ययावत करण्यात आलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंखेत वाढ करावी आणि प्राप्त उपकरणांचा शिक्षणकामी योग्य वापर व्हावा अशी अपेक्षा मंत्री आदिती तटकरे यांनी शिक्षक वर्गाकडे व्यक्त केली.
0000