मुंबई, दि. १४ :- वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उपायुक्त महानगरपालिका सदर पात्र अधिकारी उपलब्ध न झाल्याने सहाय्यक आयुक्त महानगरपालिका एक पदाससाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने सदर पदाच्या जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करूणा जुईकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
किरण वाघ/विसंअ/