मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयाच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’कार्यक्रमातील ही मुलाखत शुक्रवार दि. २२ आणि शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथे दोन दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत देशभरातील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्य सहभागी होणार असून, महिलाविषयक कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी, परस्पर सहकार्य, महिलांच्या सामाजिक प्रश्नांवरील उपाययोजना आणि देशव्यापी कृती आराखडा तयार करणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या कार्यशाळेचे नियोजन, अंमलबजावणी व अपेक्षित उद्दिष्टांबाबतची सविस्तर माहिती अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांनी ‘दिलखुलास’व ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून दिली आहे.
०००