‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत

मुंबई,दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कोरोनाला घाबरू नका, प्रत्येकाने काळजी घ्या ‘ या विषयावर राज्य  सर्वेक्षण अधिकारी  डॉ. प्रदीप आवटे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  मंगळवार दि. २५ ऑगस्ट आणि बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲप वर ही याच वेळेत ऐकता येईल. जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

या मुलाखतीत कोरोना रूग्णांची वाढती आकडेवारी बरोबर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणारे प्रमाण, कोरोना जर झाला असेल तर तो कसा ओळखावा, कोरोनाची बदलती लक्षणे, कोरोना कालावधीत कशाप्रकारे खबरदारी घ्यावी, वेळेत आरोग्य तपासणी कशी करावी, मार्च ते ऑगस्टपर्यंत वाढलेली आकडेवारी तसेच यामधील नेमके सकारात्मक बदल या सर्व विषयांची सविस्तर माहिती  डॉ.प्रदीप आवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.